कामगार मसाला ( विद्यमान नाव चव्हाण ब्रदर्स ) या घरगुती मसाला उद्योगाची सुरवात १९३७ साली कै. विष्णू नाथा चव्हाण यांनी केली. मुळात कामगार मसाला ही वास्तु मुंबई मधील लालबागमध्ये (गिरणगांव) दिग्विजय मिलच्या गेटला लागूनच आणि वेस्टर्न इंडिया मिलच्या (आगासवाडी ) शेजारी.
माया नगरी मुंबई आणि गिरण्या यांचं जसं आई आणि मुलाचं नातं होतं तसंच गिरणी कामगार (चाकरमानी) आणि कामगार मसाला यांचं आगळं वेगळं नातं होत. कारण लालबाग मधील संपूर्ण मसाला उद्योग गिरणी हा कामगार आणि मुंबईकर चाकरमानी यांच्यावर अवलंबून होता. त्यामुळे.. अर्थातच “ कामगार मसाला ” हे नांव ठेवले.
पूर्वी मसाला कुटण्याकरिता पायाच्या डंकाचा वापर केला जात होता, कारण पूर्वी तंत्रज्ञान प्रगत नव्हते. १९६५ साली लोकांच्या मसाल्याची चव, स्वादिष्टपणा टिकवून आणि वेळेची जाणीव ठेऊन कै. विष्णु नाथा चव्हाण यांनी संपूर्ण मुंबईमध्ये सर्वप्रथम विजेवर चालणारे लोखंडी डंक या मसाला उद्योगात आणले व त्यानंतर पुढे “कामगार मसाला हे नाव बदलून "चव्हाण ब्रदर्स" या नावाने सुरुवात केली. चव्हाण ब्रदर्स हे चव्हाण कुटुंबातील महराष्ट्रातले मसाला बनविण्याचे पहिले दुकान म्हणून ओळखले जाऊ लागले. मसाले अधिक चविष्ट, रुचकर आणि ग्राहकांच्या पसंतीस येतील यासाठी सध्याचे विद्यमान मालक श्री. बबन विष्णु चव्हाण यांनी १९९० साली सर्वप्रथमच या मसाला उद्योगात मिरच्यांचे देठ काढून मसाला बनवण्याची प्रक्रिया सुरु केली. म्हणूनच महाराष्ट्राची खाद्य परंपरा जपणारे लालबागचे सुप्रसिद्ध व्यापारी "चव्हाण ब्रदर्स " हे एकमेव नांव "स्वादिष्ट घरगुती मसाल्याचे माहेरघर " झाले. हे विशेष !
कै. विष्णु नाथा चव्हाण यांची तिसरी पिढी १९३७ साला पासून ते आज पर्यंत अखंडपणे पारंपरिक स्वादिष्ट घरगुती मसाल्याची चव देण्याचा यशस्वी प्रयत्न करीत आहेत. तसेच संपूर्ण महाराष्ट्र, भारत वसंपूर्ण जगातल्या विविध देशातील ग्राहकांना रुचकर जेवणासाठी "चव्हाण ब्रदर्स" ची पारंपरिक पद्धत टिकवून मसाले वितरित करीत आहे.
“Kamgar Masala” now called “Chavan Brothers” was started by the Late Vishnu Natha Chavan in 1937. It is located in Lalbaug, once known as Girangaon in South Mumbai.
The relationship between Mumbai and its textile mills was as joyous as the one between a mother and her child. If anything, it is the mill workers (Kamgar) who made the spice (Masala) industry that it is today and hence the name “Kamgar Masala”.
Technology was not advanced as it is today. The workers had to make
use of traditional tools and also involves lots of physical activity
to Pound the spices. In the year 1965, to save the time and energy
that was spent in manual pounding and also without affecting Natural
Taste of spices, Late Vishnu Natha Chavan introduced ELECTRIC TOOLS in
the spice industry and became the first person to do so, and hence
later renamed “Kamgar Masala” to “Chavan Brothers”, which is known as
the first spice shop in Chavan Family.
To make the spices tastier and to the liking (as per the taste) of the
customers, the present owner Shri. Baban Vishnu Chavan became the
first person in the industry to remove the stalks of chilies to
prepare the spices, and eventually, Chavan Brothers became a Home of
Traditional Spices.
The tradition of making spices, now, is being taken care of by the
third generation of Late Vishnu Natha Chavan.
Chavan Brothers deliver spices not only across Maharashtra but also to
various countries around the world, sharing the taste and aroma of
delicious homemade spices that started in 1937.
Our Gallery